Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुषांमध्ये भारताने मिळवले सुवर्णपदक

  Indian Tenis Team

भारताने इंग्लंडला ३-१ असे पराभूत करीत राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुषांमध्ये सुवर्णपदक मिळवले. २००४ नंतर प्रथमच भारताला हे विजेतेपद मिळाले. महिलांमध्ये भारताने चौथ्यांदा रौप्यपदक मिळवले. सिंगापूरने भारताला ३-१ असे हरवत महिलांचे सुवर्णपदक मिळाले.

दीनदयाळ उपाध्याय स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील दोन्ही गटांत भारताने अंतिम फेरी गाठल्यामुळे कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. राष्ट्रकुलमध्ये अव्वल स्थान असलेल्या सिंगापूरने महिलांच्या अंतिम फेरीत भारताला ३-१ असे हरवले. त्या वेळी मौमा दासने कोह काई झिन पेअर्लीन हिच्यावर मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता, या लढतीत सिंगापूरच्या खेळाडूंचा वरचष्मा होता. लिन येईने दोन सामने जिंकून महत्त्वाचा वाटा उचलला. तिने अंकिता दासला ९-११, ११-८, ११-७, ११-८ असे पराभूत करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ तिची सहकारी झोऊ यिहानने मनिका बात्राचा ११-९, ११-८, ८-११, ११-९ पेअर्लीनवर ११-८, ११-७, ११-३ असा सहज विजय मिळवत सामन्यातील रंगत कायम ठेवली. तथापि दडपणाखाली खेळणाऱ्या मनिकाला परतीच्या एकेरीत लिनकडून ८-११, ३-११, ६-११ अशी हार स्वीकारावी लागली. ही लढत जिंकून लिनने संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पुरुषांच्या पहिल्या लढतीत भारताच्या हरमित देसाईने पहिले दोन गेम्स जिंकल्यानंतर खेळावरील नियंत्रण गमावले व लढतही गमावली. त्याला डेव्हिड मॅकबीथने ९-११, ३-११, ११-७, ११-९, ११-९ असे हरवले. परंतु भारताच्या सौम्यजित घोषने इंग्लंडकडून खेळणारा श्रीलंकेचा खेळाडू हिशान वीरसिंघेचा ११-७, ११-४, ११-७ असा सहज पराभव करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. साथियन ज्ञानशेखरनने टॉम जेव्र्हिसवर ११-३, ११-६, ११-५ असा सफाईदार विजय मिळवत भारताला २-१ असे आधिक्य मिळवून दिले. त्याने टॉपस्पिन फटक्यांचा सुरेख खेळ करीत प्रेक्षकांना कौतुकाची संधी दिली. घौषने परतीच्या एकेरीत मॅकबिथला ११-६, ११-१३, ११-९, ११-८ असे हरवत भारताच्या विजेतेपदावर मोहर उमटवली.

Next >>