Whats new

हॉकी क्रमवारीत भारताची सातव्या स्थानी घसरण

 HOCKEY LOGO

विश्व हॉकी लीग अंतिम स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय वरिष्ठ हॉकी संघाची क्रमवारीत सातव्या स्थानी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने क्रमवारी जाहीर केली. विश्व चॅम्पियन ऑस्ट्रेलिया अग्रस्थानी कायम आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या विश्व हॉकी उपांत्य लीगमध्ये भारताने शानदार कामगिरी करताना क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करताना सहावे स्थान मिळवले होते. पण, विश्व हॉकी अंतिम स्पर्धेतील खराब कामगिरीचा फटका भारताला बसला आहे. एका स्थानाची घसरण होऊन भारत आता सातव्या स्थानी आहे. एचआयएल विजेता ऑस्ट्रेलियन संघ अव्वलस्थानी असून हॉलंड दुसऱ्या तर जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. ग्रेट ब्रिटनचा संघ चौथ्या स्थानी आहे. तर बेल्जियमने एका स्थानाची प्रगती करताना पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. अर्जेन्टिना सहाव्या स्थानी आहे.

हॉकी क्रमवारी -
1. ऑस्ट्रेलिया 2253 गुण, 2. हॉलंड – 2095 गुण, 3. जर्मनी – 1783 गुण, 4. इंग्लंड – 1658 गुण, 5. बेल्जियम – 1630 गुण, 6. अर्जेन्टिना – 1629 गुण, 7. भारत – 1603 गुण, 8. न्यूझीलंड – 1496 गुण, 9. दक्षिण कोरिया – 1313 गुण, 10. पाकिस्तान – 1235 गुण.

Next >>