Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

देशातील पहिले अनुदानित संस्कृत विद्यापीठ पश्चिम बंगालमध्ये

 SANSKRIT UNIVERSITY

पश्चिम बंगाल विधानसभेने ‘संस्कृत कॉलेज अँड युनिव्हर्सिटी-2015’ हे विधेयक पास केल्याने कोलकात्यातील 200 वर्षांच्या जुन्या संस्कृत महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. हे संस्कृत विद्यापीठ शासनाकडून अर्थसाहाय्यासह मान्यता लाभल्याने देशातील पहिले संस्कृत विद्यापीठ ठरणार आहे, असे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले. तशी उत्तरप्रदेश, बिहार व ओडिशामध्ये संस्कृत विद्यापीठे कार्यरत असली तरी शासकीय मान्यतेमुळे कोलकाता संस्कृत विद्यापीठाला वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे.

हे विद्यापीठ 2016 च्या शैक्षणिक वर्षापासून चालू होणार असले तरी गॅझेटमधील त्याची नोंद लवकर करण्यात येणार असल्याचे समजते. 1824 मध्ये स्थापन झालेले हे संस्कृत महाविद्यालय देशातील अत्यंत जुन्या शिक्षण संस्थांपैकी एक समजले जाते. त्याला 19 शतकामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर तसेच हरप्रसाद शास्त्राrसारखे अध्यापक लाभले होते. त्याच्या वाचनालयात 22 हजार हस्तलिखित ग्रंथही आहेत.

Next >>