Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

मुंबई ठरले जगातील चौथे उदयोन्मुख शहर

 mumbai

बड्या अर्थव्यवस्थांना चालना देणा-या, विकासाचे ‘इंजिन’ समजल्या जाणा-या जगातील प्रमुख शहरांत मुंबईने स्थान पटकावले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात शांघाय, बीजिंग आणि दुबईनंतर व्यापाराच्या दृष्टीने मुंबई जगातील चौथ्या क्रमांकाचे उदयोन्मुख शहर झाले आहे. या सर्वेक्षणात मुंबईने अपेक्षेप्रमाणे राजधानी दिल्ली आणि बंगळूरला मागे टाकले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत किरकोळ ग्राहकांची मागणी काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जेएलएल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढला आहे. "ग्लोबलायझेशन ऍण्ड कॉम्पिटिशन : दी न्यू वर्ल्ड ऑफ सिटीज‘ या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. काही वर्षांत नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढल्याने शहराला बकालपणा आला आहे, तरीही काही वर्षांत व्यापाराच्या दृष्टीने निर्माण होणा-या पायाभूत सुविधांमुळे मुंबई देशातील अव्वल शहर असेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारच्या स्तरावर उपाययोजना हव्यात. परवान्यांची संख्या कमी केली, तसेच इतर प्रयत्न झाले पाहिजेत. विकासाचा वेग वाढवण्यासाठी गुंतवणुकीवर भर, दर्जेदार सोयीसुविधा, कुशल मनुष्यबळ हे घटक महत्त्वाचे आहेत. या यादीत दिल्ली आणि बंगळूर अनुक्रमे 14 आणि 18 व्या स्थानी आहेत.

मुंबईला आजही जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. प्रमुख महागड्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत रिअल इस्टेट, आयटी, आऊटसोर्सिंग तसेच इतर क्षेत्रांत मोठी गुंतवणूक झाली आहे; मात्र त्या तुलनेत पायाभूत सोयीसुविधांचा विकास झालेला नाही. त्यामुळे या शहरात गुंतवणूक करणा-या कंपन्यांना दळणवळण, शीतगृहांची कमतरता अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराला "स्मार्ट‘ करण्यासाठी नियोजनबद्ध विकासाची गरज असून केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणेच महापालिकेची भूमिका महत्त्वाची असेल, असे मत या अहवालात मांडण्यात आले आहे.

पाश्चिमात्य कंपन्यांचा ओढा
पाश्चिमात्य देशांतील कंपन्यांसाठी दक्षिण आशियात व्यावसायिक विस्ताराच्या दृष्टीने मुंबई फायदेशीर आहे. या शहरातील व्यावसायिक खर्च तुलनेने कमी आहेत, त्यामुळे अशा कंपन्या भविष्यात मुंबईत बस्तान मांडतील. सध्या प्रमुख उदयोन्मुख शहरांमधील कंपन्यांचा जागतिक व्यापारातील हिस्सा 26 टक्के आहे; भविष्यात तो 50 टक्क्यांपर्यंत वाढेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Next >>