Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

फिलिपाईन्सतील पिया वर्जबॅकला 'मिस युनिव्हर्स' विजेतेपदाचा मुकूट

 piya

अमेरिकेतील लास वेगासमध्ये पार पडलेल्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत फिलिपाईन्सतील पिया वर्जबॅकला 'मिस युनिव्हर्स' विजेतेपदाचा मुकूट प्रदान करण्यात आला. सुरुवातीला सूत्रसंचालकाच्या चुकीमुळे चक्क विजेत्या विश्वसुंदरीऐवजी द्वितीय क्रमांकाच्या सौंदर्यवतीला विजेतेपदाचा मुकूट प्रदान करण्यात आला होता. पण चूक लक्षात येताच मूळ विजेत्या सौदर्यवतीला मुकूट प्रदान करण्यात आला.

अंतिम फेरीत दाखल झालेल्या फिलिपाईन्सची पिया वर्जबॅक आणि कोलंबियाची अरियादना ग्वातरेज मंचावर होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे यांनी मिस कोलंबिया अरियादना ग्वातरेजच्या नावाची ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून घोषणा केली. परंपरेनुसार २०१४ ची मिस युनिव्हर्स पॉलिना वेगा हिने मिस कोलंबिया गुटिरेज हिला मिस युनिव्हर्सचा किताबही दिला. मात्र, त्यानंतर चूक लक्षात आली आणि ग्वातरेजकडून किताब परत घेऊन फिलिपाईन्सच्या पियाला देण्यात आला. भारताचे प्रतिनिधीत्व करणारी उर्वशी रौतेला अंतिम १५ मध्ये स्थान मिळवता आले नाही.

Next >>