Whats new

अँडी मरेला बीबीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार

 andy murray

जागतिक एटीपी क्रमवारीत दुस-या स्थानी व डेव्हिस चषकाचा हिरो अँडी मरेला बीबीसीतर्फे ‘स्पोर्ट्स पर्सनलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मरेला दुस-यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयर्लंडची राजधानी बेलफास्ट येथे हा कार्यक्रम पार पडला.

गत महिन्यात डेव्हिस चषक इंग्लंड संघाला जिंकून देण्यात मरेने मोलाची कामगिरी बजावली होती. इंग्लंडने 1936 नंतर पहिल्यांदा डेव्हिस चषक जिंकला आहे. याआधी 2012 मध्ये मरेला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2012 मध्ये त्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व अमेरिकन ओपन, विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत असलेले रग्बी लीगमधून निवृत्ती स्वीकारलेले केव्हिन सीनफील्ड दुस-या स्थानी राहिले. उत्तर आयर्लंड फुटबॉल संघाचे फुटबॉल प्रशिक्षक मायकेल ओनील यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक या पुरस्काराने गौरवण्यात आले. ओनील यांनी संघाला युरो चषक स्पर्धेत आयर्लंड संघाला अंतिम फेरीतपर्यंत नेले होते. ब्रिटनचा डेव्हिस चषक संघाला सर्वोत्तम संघ म्हणून निवडला गेला.

Next >>