Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आसाम येथे होणा-या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिखोर गेंड्याच्या संकल्पनेला प्रथम पारितोषिक

  games

बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा फेब्रुवारीत आसाम येथे होत आहेत. या स्पर्धांसाठी केंद्र शासनाने ‘मॅस्कॉट’ अर्थात ‘शुभंकर’ संकल्पनेची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये कोल्हापूरच्या ‘निर्मिती ग्राफिक्स’ने पाठवलेल्या ‘तिखोर (मस्तीखोर) गेंडा’ या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले. स्पर्धेच्या निमित्ताने हा ‘तिखोर’ स्पर्धेतील सहभागी देशांत झळकणार आहे.

ही स्पर्धा आसाममध्ये प्रथमच होत आहे. त्यानिमित्त सप्टेंबर २०१५ मध्ये ‘शुभंकर’ या संकल्पनेची स्पर्धा केंद्र सरकारने आयोजित केली होती. यामध्ये देशातील ४५०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आसाममध्ये एकशिंगी गेंडा हे शुभ प्रतीक मानले जाते. त्यामुळे ‘भारतीय खेळ प्राधिकरणाने’नेही ते स्वीकारले आहे. ‘तिखोर’ हा मस्तीखोर, अल्लड व चपळ असतो. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका या देशांसाठी २६ क्रीडाप्रकार असणारी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या सहभागी देशांतही हा तिखोर अर्थात मस्तीखोर गेंडा झळकणार आहे.

२००७ साली आसाममध्ये झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘रंगमान’ हा शुभंकर आसामी गेंडा होता. त्यात सुधारणा होऊन रंगमानचा ‘तिखोर’ हा नव्या स्वरूपात व नव्या दिमाखात सादर झाला आहे.

राष्ट्रीय पातळीवरील यश..
‘निर्मिती’ने सादर केलेल्या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. यामध्ये मागील वर्षी आक्टोबरमध्ये केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या संकल्पनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन’ या संकल्पनेलाही पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘इंडो-आफ्रिका हायड्रो समिट’मध्येही संधी मिळाली होती आणि आता तिखोरच्या संकल्पनेलाही यश मिळाले आहे.

Next >>