Whats new

आयसीसी क्रमवारीत केन विल्यम्सनची अग्रस्थानी झेप

 Kane-Williamson

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यम्सनने फलंदाजी क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. भारताचा स्टार अष्टपैलू आर. अश्विननेही अष्टपैलू क्रमवारीत अग्रस्थान कायम राखले आहे. रवींद्र जडेजाही ताज्या क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. अलीकडेच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत 31 बळी घेतले होते. तसेच फलंदाजीतही चमकदार कामगिरी साकारली होती. गोलंदाजी क्रमवारीतही अश्विनने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. रवींद्र जडेजाने आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत 23 बळी घेतले होते. याचाच त्याला फायदा झाला आहे. क्रमवारीत तो पाचव्या स्थानी आहे. श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटीत शानदार शतक झळकावणा-या न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनने दोन स्थानाची प्रगती करताना अग्रस्थानी झेप घेतली. 889 गुणासह तो अग्रस्थानी असून इंग्लंडचा ज्यो रुट दुस-या तर दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स तिस-या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियन स्टीवन स्मिथ चौथ्या, डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानी आहे. गोलंदाजी क्रमवारीत आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टीनने अव्वलस्थान कायम राखले आहे. अश्विन दुस-या, इंग्लंडचा अँडरसन तिस-या स्थानी आहे. यासीर शहा चौथ्या तर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड पाचव्या स्थानी आहे. पहिल्या टॉप 10 मध्ये भारताचे दोन गोलंदाज आहेत. जडेजा सातव्या स्थानी आहे. कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकन संघ अव्वलस्थानी कायम आहे. भारत दुस-या स्थानी असून ऑस्ट्रेलिया तिस-या स्थानी आहे. लंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा किवीज संघ सहाव्या स्थानी आहे.

कसोटी फलंदाजी क्रमवारी
1. केन विल्यम्सन (न्यूझीलंड)-889 गुण, 2. ज्यो रुट (इंग्लंड)-886 गुण, 3. एबी डीव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)-881 गुण, 4. स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)-874 गुण, 5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)-863 गुण, 6. युनूस खान (पाकिस्तान)-826 गुण, 7. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) 810 गुण, 8. अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)-808 गुण, 9. ऍलिस्टर कूक (इंग्लंड) – 803 गुण, 10. मिसबाह उल हक (पाकिस्तान)-764 गुण.

Next >>