Whats new

रोलबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताला सलग दुस-यांदा जेतेपद

 roll ball

तिस-या रोलबॉल विश्वचषक स्पर्धेत पुरुष गटात भारताने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम फेरीत इराणला 6-3 असे पराभूत करताना सलग दुसऱयांदा विश्वचषकावर नाव कोरले. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली.

पुरुष गटात जगातील 33 संघ सहभागी झाले होते. अंतिम लढतीत भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. भारतातर्फे उत्कर्ष तरटे व आद्रित्य गणेशवाडे यांनी प्रत्येकी दोन गोल केले. चेतन भांडवलकर व मिहीर सानेने एक गोल केला. यापूर्वी भारताला 2011 मध्ये उपजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर 2013 मध्ये भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते. महिला गटात मात्र भारतीय संघाला गतविजेत्या भारतीय संघाला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत भारताला केनियाने 2-1 असे पराभूत केले. इराणने युगांडाला पराभूत करत तिसरे स्थान मिळवले.

Next >>