Whats new

जागतिक प्रमुख ५० कंपन्यांच्या रँकिंगमध्ये टाटा मोटर्सचा १५ वा क्रमांक; भारतातील एकमेव कंपनीचा समावेश

 tata

जागतिक 50 कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स या भारतातील एकमेव कंपनीचा समावेश करण्यात आला आहे. हे रँकिंग संशोधन आणि विकास (आर अँड डी) यांच्या आधारावर करण्यात आले आहे. मागील वर्षी टाटा मोटर्स 104 व्या स्थानावर होती. त्यांनी यामध्ये जोरदार आघाडी घेत 49 वे स्थान मिळवले आहे. यादीमध्ये सहभागी करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये भारताचे स्थान 15वे आहे.

या यादीमध्ये जर्मन कंपनी फॉक्सवॅगन प्रथम स्थानावर आहे. युरोपियन कमिशनद्वारा 2015 साठी तयार करण्यात आलेल्या आर अँड डी रँकिंगमध्ये फॉक्सवॅगन कंपनीला पहिल्या पाच कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, इंटेल आणि नोव्हारटिस यांना स्थान देण्यात आले आहे.

जगभरातील 2500 कंपन्यांमध्ये भारताच्या 26 कंपन्यांना स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये अमेरिकेच्या 829, जपानच्या 360, चीनच्या 301, तैवानच्या 114, स्वित्झलँडच्या 80 आणि कॅनडा-इस्राइलच्या 27 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. युरोपियन संघ देशातून 608, जर्मनीतून 136 कंपन्या, यूकेतून 135, फ्रान्समधून 86, स्वीडन आणि इटलीमधून 32-32 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे.

Next >>