Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सानिया-हिंगीस ठरल्या 'डबल्स वर्ल्ड चॅम्पियन्स'

  sania mirza-martina hingis

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील 'वर्ल्ड चॅम्पियन' किताब देऊन गौरवले आहे. सानिया - हिंगीस जोडीने या वर्षात टेनिसच्या महिला दुहेरी स्पर्धेवर अक्षरश: राज्य केले आहे. यापूर्वी भारताचे लिअँडर पेस-महेश भूपती यांनी १९९९ साली पुरष दुहेरीत 'वर्ल्ड चॅम्पियन'चा खिताब मिळवला होता.

मार्च २०१५ मध्ये एकत्र आलेल्या सानिया व हिंगीस या जोडीने यावर्षी नऊ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात विम्बल्डन व अमेरिक ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धांसह डब्ल्यूटीए टूर फायनल्सच्या विजेतेपदाचाही समावेश आहे. यावर्षी त्यांनी एकूण ५५ सामने जिंकले असून, गेल्या २२ सामन्यांपासून दुहेरीची ही जोडी अपराजित आहे, त्यांना अवघ्या ७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यांच्या या नेत्रदीपक व शानदार कामगिरीमुळेच त्या दोघींनाही 'वर्ल्ड चॅम्पियन्स'चा खिताब देण्यात आला आहे. दरम्यान, आयटीएफच्या महिला एकेरीत वर्ल्ड चॅम्पियन म्हणून 'सेरेना विल्यम्स' तर पुरूष एकेरीत 'नोव्हाक जोकोविचला' हा सन्मान देऊन गौरवण्यात आले.

Next >>