Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ दी इयर’

  smith

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) यावर्षीचा ‘किकेटर ऑफ दी इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार व त्याबरोबर दिला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स करंडक मिळवणारा स्मिथ हा चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. याआधी रिकी पॉंटिंग (2006 व 2007), मिशेल जॉन्सन (2009 व 2014) व मायकल क्लार्क (2013) यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार देण्यास 2004 पासून प्रारंभ करण्यात आला आहे. भारताचा भरवशाचा फलंदाज राहुल द्रविड याला 2004 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

या पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आलेल्या काळामध्ये (18 सप्टेंबर 2014 - 13 सप्टेंबर 2015) स्मिथ याने 13 कसोटी सामन्यांमध्ये 82.57 च्या स्वप्नवत सरासरीने फलंदाजी करत एकूण 25 खेळींमध्ये 1,734 धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतके व सहा अर्धशतकांचा समवेश आहे. गेल्या जून महिन्यात स्मिथ हा आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान मिळवणारा दुसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरला होता. आयसीसीच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळवणा-या सर्वांत तरुण फलंदाजाचा मान सचिन तेंडुलकरने मिळवला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंदी झालेल्या स्मिथने या पुरस्कारामुळे सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

Next >>