Whats new

जगातील प्रसिद्ध नेत्यांमध्ये भारताचे मोदी 7 व्या क्रमांकावर

 MODI

जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असून सहाव्या क्रमांकावर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आहेत. भारतीय पंतप्रधान मोदींना सातवा क्रमांक मिळाला आहे. ‘ऑब्जेट रिक्वेस्ट ब्रोकर इंटरनॅशनल’ (ओअरबी) च्या वर्ल्ड लीडर इंडेक्ससाठी केलेल्या सर्वेक्षणात 65 देशांनी भाग घेतला होता. या सर्वेक्षणात भाग घेणारे 24 टक्के मतदार मोदींच्या बाजूने असून 20 टक्के लोकांनी विरुद्ध मत दिले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग मोदींपेक्षा एक क्रमांकाने वर असले तरी भारतीय नेत्यांच्या तुलनेत त्यांना 30 टक्के प्रतिकूल मते मिळाली आहेत.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्याबाबतीत त्यांना अनुकूल मते 59 असून विरुद्ध बाजूला 29 टक्के मते आहेत. झालेल्या मतदानानुसार अमेरिकेचे ओबामा यांचे प्रशंसक सर्वात जास्त असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. ओबामानंतर जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मर्केल (+13 टक्के) असून ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन (+10 टक्के) यांचा तिसरा क्रमांक आहे. उरलेल्या दहा क्रमांकामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फांस्वा ओलांद (4), रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (5), ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डिल्मा रोसेफ (8), सौदी अरबचे राजे सलमान बिन अब्दुल्लाजिज अल सौद (9) आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी (10) आहेत.

Next >>