Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

‘रिलायन्स’ कंपनी क्षेपणास्त्रे बनविणार

 RELIANCE

‘रिलायन्स डिफेंस लिमिटेड’ आणि हवेतून क्षेपणास्त्रांचा मारा ही प्रणाली विकसित करणारी रशियाची प्रमुख कंपनी ‘अलमाजआंते’ यांच्या महत्त्वपूर्ण करार संपन्न झाला आहे. सदर कंपनी भारतीय संरक्षण दलासाठी आवश्यक अशी क्षेपणास्त्रे आणि रडार प्रणालींसाठी मदत करणार आहे.

अलमाजआंतेने एस 400 ट्रायंफ ही हवाई संरक्षण प्रणाली विकसित केली असून भारताने ही प्रणाली 40,000 कोटी रुपयांनी खरेदी करण्याबाबत तयारी दर्शविली आहे. ‘अनिल धीरूभाई अंबानी गुप’चे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात अनिल अंबानी म्हणाले की, दोन्ही कंपन्यांकडून या कराराबाबत सर्व माहिती घेतली आहे. हवाई संरक्षण प्रणालीमधील टीओआर-1 क्षेपणास्त्र कार्यक्रम, रडार आणि ऑटोमोटेड रडागर पद्धतीचा समावेश आहे. तसेच रशियन ‘अलमाजआंते’ कंपनी ‘मेक इन इंडिया’मध्येही गुंतवणूक करणार आहे.

Next >>