Whats new

श्रीलंकेचा यष्टिरक्षक कुशल परेरावर चार वर्षांची बंदी

 Kusal Perera

बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्यांच्या सेवनप्रकरणी ‘ब’ चाचणीच्या नमुन्यांमध्ये दोषी आढळल्यामुळे श्रीलंकेचा यष्टिरक्षक कुशल परेरावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.  ‘‘परेराला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कळवले आहे,’’ असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयाशेखरा यांनी सांगितले.

आयसीसीच्या चाचणीत बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्यांचे सेवन परेराने केल्याचे सिद्ध झाल्यानंतर कतार येथे त्याच्या मूत्रनमुन्याची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघातून त्याला वगळण्यात आले. श्रीलंकेने ही मालिका ०-२ अशी गमावली. उत्तेजक द्रव्य पदार्थाचे सेवनप्रकरणी दोषी आढळणारा परेरा हा श्रीलंकेचा दुसरा क्रिकेटपटू आहे. २०११च्या विश्वचषकानंतर डावखुरा फलंदाज उपुल थरंगा दोषी आढळला होता.

Next >>