Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

देशात विजेच्या उत्पादनात ५ टक्के वाढ

 power

भारतातील वीज उत्पादनात २०१५ मध्ये २०१४ च्या तुलनेत ५ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या केंद्रीय वीज प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान ९०८ अब्ज युनिट विजेचे उत्पादन झाले आहे. कोळशाचे वाढलेले उत्पादन आणि पुरेशी उपलब्धता यामुळे वीज निर्मितीत वाढ झाली आहे. देशभरात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत विजेतील तूटही कमी होऊन ती गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ अब्ज युनिट, म्हणजे ३६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. विजेची उपलब्धता लक्षात घेतल्यास तूट उणे चारवरून उणे २.५ टक्क्यांवर आली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘कोल इंडिया’चे देशांतर्गत कोळशाचे उत्पादन आणि विक्रीत वाढ झाली आहे. परिणामी वीज उत्पादनास मोठा हातभार लागला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१५ मध्ये ‘कोल इंडिया’ने ४२५ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन व ४३१ दशलक्ष टन कोळसा विक्री केली. विशेष म्हणजे वीज वहनाच्या पायाभूत सुविधेचाही यंदा चांगला उपयोग झाला. २०१४-१५ मध्ये देशात २२,१०० कि.मी. वहन मार्गिकांची निर्मिती करण्यात आली. २०१३-१४ च्या तुलनेत त्यात एक तृतीयांश वाढ झाली आहे. वीज परिवर्तनाची क्षमताही १४ टक्क्यांनी वाढून ६५,५५० एमव्हीए (मेगा व्होल्ट अॅम्प) झाली, हे सुद्धा दिलासादायक आहे.

Next >>