Whats new

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५ वी 'मन की बात'

 pm modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ व्‍या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी देशवासियांना नाताळ आणि आगामी नवर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी स्वच्छतेच्या मुद्दावर भर दिला. सध्या नाताळच्या सुट्टया असल्याने देशात पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवली पाहिजे. आपण अतिथी देवो भव म्हणतो. जेव्हा पाहुणे आपल्या घरी येणार असतात तेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या पर्यटनस्थळी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवली पाहिजे. ज्यामुळे जगात भारताची प्रतिमा आणखी चांगली होईल असे मोदी म्हणाले.

'मन की बात' मधील मुद्दे-
· पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमातून नाताळ आणि आगामी नववर्षाच्या देशवासियांना दिल्या शुभेच्छा.
· पर्यटनस्थळी विशेष स्वच्छता अभियान राबवण्याची गरज
· अतिथी देवो भव, पाहुणे घरी येतात तेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांवरही स्वच्छता ठेवली पाहिजे.
· वीज नव्या गावात पोहोचल्याची बातमी मिळते तेव्हा आनंद, समाधान मिळते.
· मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करा आणि थेट माझ्याशी संपर्क साधा.
· १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्ट अप इंडिया अँण्ड स्टॅंण्ड अप इंडियाचा अॅक्शन प्लान देशासमोर सादर करणार.
· स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यंदा छत्तीसगडमध्ये युथ फेस्टीव्हलचे आयोजन, युथ फेस्टीव्हलसाठी नरेंद्र मोदी अॅपवर नव्या कल्पना सांगा.
· आपण ज्यांना विकलांग म्हणतो त्यांना ईश्वराने अतिरिक्त शक्ती दिली आहे जी आपण पाहू शकत नाही, आपण तिथे विकलांगऐवजी दिव्यांग शब्द वापरु शकतो का ?
· योजना लोकांसाठी असतात, त्या फायलीपर्यंत मर्यादीत रहाता कामा नयेत.
· २६ जानेवारीपूर्वी कर्तव्य या विषयावर तुमचे विचार मला कळवा, या विषयावर मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत.
· डीबीटीएस, थेट लाभ हस्तांतरण योजनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले, या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली.
· विविध योजनांतर्गत ४० हजार कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले.

Next >>