Whats new

बुलेट ट्रेनमुळे एमएसएमईला 51 अब्ज डॉलरचा व्यवसाय

 msme

98 हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प तसेच स्वर्णिम चतुर्भुज प्रकल्प येत्या काही वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये 6 हजार किलोमीटर लांब हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. याचा मोठा फायदा एमएसएमईला (लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र) होण्याची शक्यता आहे. स्थानिक एजन्सीने केलेल्या एका अहवालानुसार, जर सरकार या प्रकल्पासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून 30 टक्के खरेदी अनिवार्य करणार असेल तर या क्षेत्रासाठी 51 अब्ज डॉलरचा फायदा होऊ शकतो. जर प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली, तर पुढील 10 वर्षांत यावर 168 अब्ज डॉलरची मोठी रक्कम खर्च होणार आहे. यामध्ये एमएसएमईसाठी तंत्रज्ञान आणि विविध संशोधनासह फंडिंगच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

सरकार ऑफसेट क्लॉजच्या माध्यमातून 30 टक्के खरेदी अनिवार्य करत असेल, तर या मोठय़ा प्रकल्पासाठी विशेष यंत्रसामग्री, फॅब्रिकेटेड मेटल्स आणि छपाईसह अन्य क्षेत्रात काम करणा-या 28 टक्के एमएसएमईला फायदा होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात जवळपास 21 अब्ज डॉलरचा व्यवसाय येण्याची शक्यता आहे.

Next >>