Whats new

आयसीसीने घातली पाकिस्तानच्या यासिर शाहवर तात्पुरती बंदी

 yasir shah

उत्तेजक द्रव्यसेवन (डोपिंग) चाचणीत दोषी आढळल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाहवर तात्पुरती बंदी घातली आहे. अबुधाबीत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वनडेदरम्यान आंतरराष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (वाडा) क्रिकेटपटूंची चाचणी घेतली. त्यात यासिर दोषी आढळला.यासिरच्या पुढील बंदीबाबत आयसीसी नंतर निर्णय घेणार असल्याचे समजते. दरम्यान, यासिरवरील बंदीमुळे आगामी न्यूझीलंड दौ-यातील पाकिस्तानच्या योजनांना (प्लान) धक्का बसल्याचे पाकिस्तान बोर्डाचे (पीसीबी) मुख्य सिलेक्टर हरून रशिद यांनी म्हटले आहे.

Next >>