Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अफगाणिस्तान संघाने पटकावले प्रथमच टॉप टेनमध्ये स्थान

 icc

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वनडे क्रमवारीत अफगाणिस्तान संघाने प्रथमच अव्वल दहा संघांमध्ये (टॉप टेन) स्थान मिळवले. प्रसिद्ध झालेल्या ताज्या क्रमवारीत ४८ रेटिंग गुणांसह अफगाणिस्तान दहाव्या स्थानी आहे. अफगाणिस्तानने शारजात सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच लढतींच्या वनडे मालिकेत विजयी सलामीसह १-० अशी आघाडी घेतली आहे. ही मालिका जिंकल्यास वर्षअखेर अफगाणिस्तान अव्वल दहा संघांमध्ये स्थान राखू शकेल. आयसीसी वनडे क्रमवारीत जगज्जेता ऑस्ट्रेलियाने १२७ गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. ११४ गुणांसह भारत दुस-या स्थानी आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपसाठी ते पात्र ठरले. साखळीत आव्हान संपले तरी त्यांनी स्कॉटलंडला हरवून वर्ल्डकपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये झिम्बाब्वेला त्यांच्या घरच्या मैदानात वनडे मालिकेत ३-२ असे हरवले. कसोटी दर्जा असलेल्या संघाविरुद्ध अफगाणिस्तानने जिंकलेली ही पहिलीची द्विपक्षीय मालिका आहे.

Next >>