Whats new

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ के. पी. विश्वनाथ

 mahatma phule

गळूरच्या कृषी विज्ञान विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. के. पी. विश्वनाथ यांची राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी डॉ. विश्वनाथ यांच्या नावाची घोषणा केली. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांचा कार्यकाळ 30 डिसेंबर रोजी संपत आहे.

बंगळुरूच्या कृषी विज्ञान विद्यापीठातून डॉ. विश्वनाथ यांनी एमएस्सी (कृषी) व पीएचडी प्राप्त केली आहे. तमिळनाडूच्या अन्नमलाई विद्यापीठातून 'बौद्धिक मालमत्ता हक्क' या विषयातदेखील त्यांनी पीएचडी मिळवली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन या क्षेत्रांतील व्यापक अनुभव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तयार केली होती. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. विश्वनाथ यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.

Next >>