Whats new

‘म्हाळसा’ फेम अभिनेत्री सुरभी हांडे यादव खैरनार पुरस्काराने सन्मानित

 mhalsa

पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक आणि येथील परिवर्तन संस्था यांच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेस मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ‘जय मल्हार’ मालिकेतील ‘म्हाळसा’ म्हणजेच सुरभी हांडे यांच्यासह अभिनेते दिग्दर्शक नंदू माधव, कवी ना. धों. महानोर, सुरेश भोळे, रत्ना जैन आदी उपस्थित होते. ‘एकला चलो रे’ या रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिनेत्री सुरभी हांडे यांना दिग्दर्शक नंदू माधव यांच्या हस्ते यादव खैरनार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत खान्देशातील १६ आणि मराठवाड्यातील सात महाविद्यालयांचा सहभाग असून २३ एकांकिका सादर होणार आहेत.

Next >>