Whats new

पुणे फिल्म महोत्सवात ‘कथाकार’, ‘वसू’ यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार

 mahotsava

‘मराठी चित्रपट परिवार’, ‘ग्रीन चिलीज एन्टरटेन्मेंट’ आणि ‘ए के फिल्म्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या ‘पुणे लघुपट महोत्सवा’त ‘व्हिजलिंग वूड्स इंटरनॅशनल’च्या ‘कथाकार’ व ‘फिश आय प्रॉडक्शन’च्या ‘वसु’ या दोन लघुपटांना सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक मिळाले. लघुपट महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या शंभर लघुपटांपैकी अकरा लघुपटांना पारितोषिक मिळाली आहेत. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे संचालक विकास पाटीर व निर्माते दिपक शहा यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले. ‘कॅफे इराणी चाय’ या लघुपटासाठी डॉ. मन्सूर येझदी आणि ‘धोंडा’ या लघुपटासाठी शेखर रणखांबे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. तर, सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारितोषिक ‘शुक्रवार’ आणि ‘नाना परिट पांगरी’ या लघुपटांना विभागून देण्यात आले आहे. ‘वसु’ या लघुपटासाठी नितीन गोजे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.

सर्वोत्कृष्ट पटकथाचे पारितोषिक राजस्थानमधील ‘दि ब्रोकन ड्रिम्स’ या लघुपटासाठी करण आर्य यांनी पटकावले. सर्वोत्कृष्ट संकलनासाठी ‘शुक्रवार’ छायाचित्रणासाठी ‘कवडसे’ या लघुपटांची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट संकल्पनेसाठी ‘व्हाय’ या लघुपटाला पारिपोषिक मिळाले. या महोत्सवासाठी 32 देशांमधील 442 लघुपट निर्मात्यांनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी शंभर लघुपटांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.

Next >>