Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

चीनमधील शेन्झेन शहरात तब्बल २१ फुटबॉल मैदानांएवढे मोठे स्थानक

 china

चीनमधील शेन्झेन शहरात तब्बल २१ फुटबॉल मैदानांएवढे मोठे स्थानक साकार झाले आहे. फ्युटेन हायस्पीड रेल्वे स्टेशन या आशियातील सर्वांत मोठ्या भूमिगत रेल्वे स्थानकाचे नुकतेच उद्घाटन झाले. या स्थानकामुळे गाँगझो आणि हाँगकाँग प्रवासाच्या वेळात तब्बल अर्धा ते एक तासाची घट होणार आहे.

१.४७ लाख चौरस मीटर परिसरात हे स्थानक पसरले आहे. या तीन मजली स्थानकात १ हजार २०० आसने असून, तिथे एका वेळी सुमारे ३ हजार प्रवासी ट्रेनची प्रतीक्षा करू शकतील, अशी माहिती आहे. या स्थानकामुळे शेन्झेनमधील रहिवासी अवघ्या १५ मिनिटांत हाँगकाँग गाठू शकतात. ३० डिसेंबर ते ९ जानेवारीदरम्यान या स्थानकातून रोज अतिवेगवान २२ ट्रेन्स ये-जा करतील. फ्युटेन रेल्वे स्थानक १०२३ मीटर लांब आणि ७८.८६ मीटर रुंद आहे. ओपन-कट पद्धतीने ३२ मीटर खोलीवर हे स्थानक उभारण्यात आले आहे.

Next >>