Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचे ३१०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

 duskal

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने ३१०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन त्यात मदतीचा निर्णय झाला. राष्ट्रीय आपत्तीनिवारण निधीतून (एनडीआरएफ) ही मदत मिळणार असून, मध्य प्रदेशलाही २०३३ कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल.

महाराष्ट्रात २१ जिल्ह्यांमधील १५७४७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, राज्य सरकारने केंद्राकडे चार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी कृषी खात्याने पाठवलेल्या पथकाचा दौरा नोव्हेंबरमध्येच पूर्ण झाला होता. मध्य प्रदेशातही दुष्काळी परिस्थितीची पाहणी केंद्राच्या पथकाने केली होती. केंद्रीय मदत पथकाने महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. त्या आधारावर ही मदत जाहीर केली आहे. यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये १४ टक्के घट झाली. गेल्या वर्षी १२ टक्के घट झाली होती. वारंवार पडणा-या दुष्काळामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

इतर राज्यांना आतापर्यंत मिळालेली मदत
(कोटींमध्ये)
छत्तीसगड ९२५
ओडिशा ३८०
कर्नाटक १५००
तमिळनाडू ९००

Next >>