Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

रघुवीर चौधरी यांना २०१५ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

 raghuvir

गुजराती साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांना २०१५ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. नामवर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौधरी यांची निवड केली. पुढील वर्षी होणा-या समारंभात चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. २०१५ हे पुरस्काराचे ५१ वे वर्ष असून, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे चौधरी हे देशातील ५६ वे, तर चौथे गुजराती लेखक ठरले आहेत. काही वर्षे हा पुरस्कार संयुक्तपणे दिला गेला होता. चौधरी यांची ‘रूद्र महालय’ ही त्यांची कादंबरी विशेष करून गाजली. ही कादंबरी ऐतिहासिक गुजराती लिखाणातील मैलाचा दगड म्हणून ओळखली जाते. त्यांचे निबंध लेखनही प्रसिद्ध आहेत. १९३८ मध्ये जन्मलेल्या रघुवीर चौधरी यांनी कादंबरी, कविता, समीक्षा आदी क्षेत्रात व्यापक साहित्य निर्मिती केली आहे. त्यांना गुजराती साहित्यात मानाचे स्थान आहे. कादंबरीकार, कवी, समीक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या चौधरींवर गोवर्धनराम त्रिपाठी, काका कालेलकर, सुरेश जोशी, प्रा. रामदर्श मिश्रा, प्रा. जी. एन. डिकी यांच्या लिखाणाचा प्रभाव होता. त्यांच्या कविता गंभीर आशय, प्रतिमा आणि प्रतीकात्मक चिन्हांचा अचूक वापरासाठी परिचित आहेत. सृजनशील लेखन आणि विचारांचे स्पष्ट सादरीकरणाविषयी सूक्ष्म निरीक्षण ही त्यांच्या निबंधलेखनाची वैशिष्ट्ये होत. चौधरी यांना काव्य रचनेत जास्त रुची होती. परंतु त्यांच्या कादंबरीसुद्धा अतिशय वाचनीय आहेत. मानवी जीवनाच्या कार्यशील पैलूंवर विश्वास त्यांच्या साहित्यातून उत्तरोत्तर वृद्धिंगत झाल्याचे जाणवते. अमृता, वेणू वात्सल्य आणि उप्रवास कथात्रय या कादंबरी याचे उत्तम उदाहरण आहेत.

विविध पुरस्कारांचे मानकरी
· ‘उप्रवास कथात्रय’साठी १९७७ साली त्यांना साहित्य अकादमी
· कुमार चंद्रक (कवितांसाठी)
· उमा स्नेहरत्न व रंजितराम सुवर्णपदक (सर्जनशील लेखनासाठी)
· उत्तर प्रदेश हिंदी संस्थानचा सौहार्द सन्मान

सर्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते

 वर्ष 

   पुरस्कार विजेते

  योगदान आणि कार्ये

  भाषा

२०१४

 भालचंद्र नेमाडे (५०वा      ज्ञानपीठ पुरस्कार)

 कोसला

  मराठी

२०१३

 केदारनाथ सिंह

 अकाल में सरस

 हिंदी

२०१२

 रवुरी भारद्वाज

 पाकुडुरल्लू

 तेलुगू

२०११

 प्रतिभा रे

 यजनसेरी

 उडिया

२०१०

 चंद्रशेखर कम्बार

  कन्नड साहित्यातील निर्मितीकरिता

कन्नड

२००९

 

 अमर कांत

 श्रीलाल शुक्ल

 

हिंदी

२००८

 अखलाख मोहम्मद खान ‘शहरयार’

  उर्दू भाषेतील कवितांकरिता

 

 उर्दू

२००७

 डा. ओ. एन. व्ही. कुरूप

मलयालम साहित्यनिर्मितीकरिता

मलयालम

२००६

 सत्यवत शास्त्री

रवींद्र केळेकर

 

संस्कृत

कोंकणी

२००५

 कुंवर नारायण

 

 हिंदी

२००४

 रहमान राही

 सुभुक सोडा, कलामी राही, सिया रोडे जरे मांझ

 काश्मिरी

२००३

 विंदा करंदीकर

 अष्टदर्शन (कविता)

 मराठी

२००२

 डी. जयकांतन

 

 तमिळ

२००१

 राजेंद्र केशवलाल शाह

 

 गुजराती

२०००

 

 इंदिरा गोस्वामी

 

 आसामी

१९९९

 गुरदयाल सिंह

 

 पंजाबी

१९९९

 निर्मल वर्मा

 

 हिंदी

१९९८

 गिरीश कर्नाड

कन्नड साहित्य तसेच कन्नड नाटक (ययाती) च्या योगदानाकरिता

 कन्नड

१९९७

अली सरदार जाफरी

 

 उर्दू

१९९६

 महाश्वेता देवी

 हजार चौर-यासीर माँ

 बंगाली

१९९५

डा. एम. टी. वासुदेवन नायर

 रंदमूझम

 मलयालम

१९९४

 यू. आर. अनंतमूर्ती

 कन्नड साहित्यातील योगदानाकरिता

 कन्नड

१९९३

 सीमाकांत महापात्रा

 भारतीय साहित्यातील योगदानाकरिता

 उडिया

१९९२

 नरेंद्र मेहता

 

 हिंदी

१९९१

सुभास मुखोपाध्याय

 पडती

 बंगाली

१९९०

 व्ही. के. गोकाक (विनायक कृष्णा गोकाक)

 भारत सिंधू रश्मी

 कन्नड

१९८९

कुर्तुलएन हैदर

 आग का दरिया

 उर्दू

१९८८

 डा. सी. नारायण रेड्डी

 विश्वंभरा

 तेलुगू

१९८७

विष्णू वामन शिरवाळकर (कुसुमाग्रज)

 नटसम्राट

 मराठी

१९८६

 सच्चिदानंद राऊतराय

 सच्ची

 उडिया

१९८५

पन्नालाल पटेल

 मानवी नी भावाई (માનવીની ભવાઇ)

 गुजराती

१९८४

थकाझी शिवशंकर पिल्ले

 चेमीन

 मलयालम

१९८३

मस्ती वेंकटेश अय्यंगर

चिक्कावीर राजेंद्र (कोडव राजा चिक्कावीर राजेंद्र यांचे जीवन आणि संघर्ष)

 कन्नड

१९८२

 महादेवी वर्मा

 यम

 हिंदी

१९८१

 अमृता प्रितम

 कागज कॅन्व्हास

 पंजाबी

१९८०

 एस. के. पोट्टेकर

 ओरू देसाथिन्ते कथा (जमिनीची कथा)

 मलयालम

१९७९

वीरेंद्र कुमार भट्टाचार्य

 मृत्युंजय

 आसामी

१९७८

सत्तचिदानंद हिरानंद वात्सायन

 कितनी नावों में कितनी बार

 हिंदी

१९७७

 के. शिवराम कारंथ

कुक्कजिया कानयुगलू

 कन्नड

१९७६

 आशापूर्णा देवी

 प्रथम प्रतिसृती

 बंगाली

१९७५

 पी. व्ही. अकिलान

 चित्तिरपवई

 तमिळ

१९७४

विष्णू सखाराम खांडेकर

 ययाती

 मराठी

१९७३

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे

गोपीनाथ मोहन्ती

 वाकुतंथी

मती मनल

 कन्नड

उडिया

१९७२

 रामधारीसिंह 'दीनकर'

 उर्वशी

 हिंदी

१९७१

 विष्णू डे

 स्मृती सत्य भविष्यत्

 बंगाली

१९७०

विश्वनाथ सत्यनारायण

 रामायण कल्पवृक्षम्

 तेलुगू

१९६९

 फिराख गोरखपुरी

 गूल ए नगमा

 उर्दू

१९६८

 सुमित्रानंदन पंत

 चिदंबरा

 हिंदी

१९६७

उमाशंकर जोशी

कुप्पली वेंकटप्पागोवडा पुट्टप्पा (कुवेम्पू)

 निशिग्ध

श्री रामायण दर्शनम

 गुजराती

कन्नड

१९६६

 महाशंकर बंडोपाध्याय

 गणदेवता

 बंगाली

१९६५

 जी. शंकर कुरूप

 ओट्टाकुझुल

 मलयालम