Whats new

हरपाल सिंह यांना नाइटहूड सन्मान

  harpal_singh

 

कॅन्सरचे उपचार आणि त्यावर प्रतिबंध यावर संशोधन करणारे भारतीय वंशाचे तज्ज्ञ हरपाल सिंह कुमार यांना नाइटहूडने सन्मानित करण्यात आले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी हरपाल सिंह यांना सन्मानित केले. त्यांचे नाव आता न्यू इअर्स आनर्स सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे. कॅन्सर रिसर्च यूकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले हरपाल सिंह यांचे या क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रशस्तिपत्रात म्हटले आहे, की कॅन्सरशी संबंधित प्रतिबंध, निदान आणि उपचार यासाठी प्रोत्साहन देण्यात हरपाल सिंह यांची भूमिका महत्त्वाची आहे. धूम्रपान कमी करण्यासाठी आणि यासंदर्भात सरकारवर कायम दबाव ठेवण्यासाठी हरपाल सिंह यांची भूमिका मोलाची आहे.