Whats new

मुंबईच्या सागरी मार्गाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी

highway

सॅन दिएगो आणि सिडनीच्या धर्तीवर मुंबईत प्रस्तावित 33.2 किलोमीटरच्या नरीमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतच्या सागरी मार्गासाठी तब्बल 12 हजार कोटींच्या रस्त्याची अंतिम अधिसूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली.

सागरी मार्गासाठी राज्य सरकार 160 हेक्‍टर समुद्रामध्ये भराव टाकणार आहेत. हा भराव प्रकल्पातील 9.8 किलोमीटरच्या पट्ट्यासाठी आवश्‍यक आहे आणि त्या ठिकाणी 8 किलोमीटरचा पट्‌टा हा तीन ठिकाणी कांदवळने कापला जाणार आहे. ही अधिसूचना निघण्यापूर्वी समुद्रात भराव करण्यास सीआरझेड कायद्यातंर्गत मनाई करण्यात आली होती; परंतु मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांत कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि आता समुद्रात भराव करण्यास कोणताही अडथळा येणार नाही.