Whats new

दत्ता पडसळगीकर नवीन पोलिस आयुक्तपदी नियुक्त

 police

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी दत्ता पडसळगीकर यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याबाबतचा आदेश काढण्यात आला. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले पडसळगीकर नवीन वर्षात सूत्रे स्वीकारणार आहेत.

मुंबईचे पोलिस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. अहमद लवकरच नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलिस आयुक्तपदासाठी राज्य सरकारने पडसळगीकर यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयात महत्त्वाच्या जबाबदारीवर असलेल्या पडसळगीकर यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यांनी काही वर्षे मुंबई पोलिस दलात काम केले आहे. कर्तव्यनिष्ठ आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. Next >>