Whats new

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सिंधुदुर्गभूषण पुरस्कार

  sadguru

 

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे ‘सिंधुदुर्गभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात. समाजाला नवी दिशा देण्याचे काम डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समर्थपणे चालवले आहे. स्वच्छता मोहीम, सुंदर शहर, स्वच्छ शहर अभियान राज्यभरात धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी राबवले जाते. आध्यात्मिक क्षेत्रात भरीव काम करून वाममार्गाकडे जाणा-या नव्या पिढीला योग्य दिशा दाखवण्याचे काम हे प्रतिष्ठान करीत आहे. व्यसनमुक्ती, मन:शांती, सुदृढ आरोग्य आदी उपक्रम घेतले जातात. याच कामातून प्रेरित होऊन जिल्हा परिषदेने डॉ. आप्पासाहेबांना हा पुरस्कार जाहीर केला.