Whats new

क्वालालम्पूर विश्‍व योगा अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरकर वैभव श्रीरामेने पटकावलीत पाच पदके

yoga

योगासनांत नागपूरच्या १५ वर्षीय वैभव श्रीरामेने नुकत्याच क्वालालम्पूर येथे झालेल्या विश्‍व योगा अजिंक्‍यपद स्पर्धेत १२ ते १८ वर्षे वयोगटात पाच पदके जिंकून आपल्या गुणवत्तेचा परिचय दिला. गेल्यावर्षीही त्याची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यास विश्‍व स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. विश्‍व स्पर्धेत १९ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. त्यात वैभवने योगासनांमध्ये सुवर्ण, आर्टिस्टिक एकेरी व योगासन नृत्यात रौप्य, आर्टिस्टिक दुहेरी, -हीदमीक दुहेरीत ब्रांझपदक जिंकले. त्याला यापूर्वी दोनदा राष्ट्रीय स्पर्धेत ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ हा किताब मिळाला आहे. अशी कामगिरी करणारा महाराष्ट्रातील तो एकमेव योगपटू असल्याचा दावा त्याने केला.