Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

देशात 1800 उद्योगांना प्रदूषणमापन यंत्रणा : जावडेकर

 POLLUTION

नद्या प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातील 1800 उद्योगांना प्रदूषणमापनाची यंत्रणा बसवली आहे. या उद्योगांनी प्रदूषणाची पातळी ओलांडल्यास त्याची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळणार असून, त्या उद्योगांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच, पुण्यातील नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी 900 कोटींचा प्रकल्प मंजूर केला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, आरती किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, जॉन बोमन, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. याप्रसंगी पर्यावरणात उल्लेखनीय कार्य करणा-या अभ्यासकांचा विशेष सत्कार करण्यात आला. पक्षितज्ज्ञ डॉ. प्रमोद पाटील, हत्तींच्या संरक्षणासाठी झटणारे एम. आनंद कुमार, गीर राष्ट्रीय उद्यानातील "द लायन्स क्वीन्स ऑफ इंडिया‘ म्हणून ओळखल्या जाणा-या रसिला वधेर, दर्शना कगडा, किरण पिथिया, सारंग यादवाडकर यांचा सन्मान केला. जगातील 17 टक्के लोकसंख्या आपल्या देशात असली, तरीही 17 टक्के पशू-प्राणी, 8 टक्के जैवविविधताही आहे. या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी लोकसहभागातून प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.