Whats new

पुण्यातील दोन विद्यार्थिनी ब्लूमबर्ग चॅंपियन्स

 singhgad

ब्लूमबर्ग चॅंपियन्स प्रोग्रॅम या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप उपक्रमात पुण्यातील दोन विद्यार्थिनींनी आशिया खंडात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ब्लूमबर्गबरोबर शैक्षणिक भागीदारी असलेल्या संस्थांसाठी हा प्रोग्रॅम आहे. त्यात सहभागी संस्थांतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. या प्रोग्रॅममध्ये संधी मिळालेल्या येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे ऐश्‍वर्य भुतडा आणि मधुरा मेहेंदळे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला आहे.  हा ऑफसाइट इंटर्नशिप उपक्रम असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना 11 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात माहिती, लोक आणि कल्पनांचे जाळे विणण्यासंबंधीच्या प्रशिक्षणाचा समावेश होता. आशियातील 36 मॅनेजमेंट संस्थांतील 72 विद्यार्थ्यांना या प्रोग्रॅममध्ये संधी मिळाली. प्रशिक्षण कालावधीतील असाइमेंटचे मूल्यमापन करून मानांकन तयार करण्यात आले. त्यात ऐश्‍वर्य प्रथम तर मधुरा द्वितीय ठरली.