Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोचे 14 चेंडूत अर्धशतक

  munro

श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकाविले. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हे दुस-या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक आहे.

जगातील सर्वांत लहान मैदानांपैकी एक असलेल्या ऑकलंडमधील मैदानावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 142 धावा केल्या होत्या. यामध्ये अँजेलो मॅथ्यूजच्या नाबाद 82 धावांचा वाटा होता. श्रीलंकेचे हे आव्हान न्यूझीलंडने एक गड्याच्या मोबदल्यात फक्त 10 षटकांतच पूर्ण केले. या विजयामुळे न्यूझीलंडने दोन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका 2-0 अशी जिंकली.

सलामीवीर मार्टिन गुप्टीलने आपली लय कायम ठेवताना अर्धशतक झळकावित 25 चेंडूत 63 धावा केल्या. यात पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. गुप्टिल बाद झाल्यानंतर आलेल्या मुन्रोने पहिल्या चेंडूपासून आक्रमणास सुरवात केली. त्याने अवघ्या 14 चेंडूत सात षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने नाबाद अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक युवराजसिंगने झळकाविलेले आहे. त्याने 12 चेंडूत अर्धशतक केले होते.