Whats new

चीन उभारणार पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण

 DHARAN

भारताच्या विरोधानंतरही चीनच्या सरकारी कंपनीने चीनपाठोपाठ आता पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधण्याची घोषणा केली आहे. झेलम नदीवर हे धरण बांधण्यात येणार असून, यातून ११०० मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २.४ अब्ज रुपये खर्च येणार आहे. यापूर्वी या कंपनीने चीनमध्येही मोठे धरण बांधले आहे.

जलविद्युत निर्मितीत आघाडीवर असलेल्या चायना थ्री जॉर्जेस कॉर्पोरेशनने (सीटीजीसी) या चीनमधील सरकारी कंपनीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. चायना थ्री जॉर्जेस कॉर्पोरेशन या कंपनीने पाकव्याप्त काश्मीरमधील कोहला येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पाकिस्तानशी करार केला आहे. याबद्दलची माहिती कंपनीने आपल्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली आहे. चीनने या प्रकल्पासाठी ३० वर्षे भाडेपट्ट्याचा करार केला आहे. कोहला धरण हे न्यू चायना पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरमधील महत्त्वाचा प्रकल्प आहे. या कॉरिडॉरमुळे चीनचा जिनझियांग भाग थेट पाकिस्तानातील ग्वादर बंदराला जोडला जाणार आहे.