Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

जैतापूर पंचक्रोशीतला सौर ऊर्जेवरील पहिल्या घराचा प्रयोग यशस्वी

 SAUR

प्रस्तावित अणुप्रकल्पामुळे चर्चेत असलेल्या जैतापूरमधल्या एका घराला सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असून, पंचक्रोशीतील हा पहिला यशस्वी प्रयोग मानण्यात येत आहे. आगरवाडी भागातील लक्ष्मी प्रसाद या विलास मांजरेकर यांच्या वास्तूला सोलर पॉवर पॅक युनिटने वीजपुरवठा करण्यात येत आहे. २५० वॅटची सहा पॅनल यासाठी बसवण्यात आली आहे. संपूर्ण वास्तूचा २ KV पर्यंतचा भार घेण्याची या युनिटची क्षमता आहे. या घरातली सगळी विजेची उपकरणे सौरऊर्जेवर चालवण्यात येत असून, ही यंत्रणा बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. या यंत्रणेचा खर्च अडीच लाख रुपयांच्या आसपास असून, तिचे आयुर्मान २५ वर्षे असल्याचे ही यंत्रणा पुरवणा-या कंपनीने म्हटले आहे.