Whats new

पुण्यातील हवालदाराच्या 'कम्प्लेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम'ला देशभरातून दुसरा क्रमांक

 ingawale

पोलिस दलातील हवालदार रवींद्र इंगवले यांनी दलासाठी विकसित केलेल्या 24 संगणक प्रणालींपैकी एका प्रणालीस अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात दुसरे पारितोषिक मिळाले आहे. या सन्मानामुळे पुणे पोलिस दलाची मान उंचावली आहे.बिनतारी संदेश विभागात नेमणुकीस असलेले इंगवले पुणे पोलिस दलात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांनी तयार केलेल्या "कंम्पलेन्ट ऍप्लिकेशन मॅनेजमेंट सिस्टीम‘ला देशभरातील संगणक प्रणालीतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. देशपातळीवर झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाचे नेतृत्व इंगवले यांनी केले.

या स्पर्धेत 19 पोलिस विभागांतून 48 संगणक प्रणाली आल्या होत्या. त्यातून इंगवले यांच्या प्रणालीने द्वितीय क्रमांक पटकावला. कुणाचीही मदत न घेता इंगवले यांनी ही संगणक प्रणाली विकसित केली असून, यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे.