Whats new

ताज्या मानांकनात सानियाचे अग्रस्थान कायम, बोपण्णा नवव्या स्थानी

 sania

डब्ल्यूटीएच्या ताज्या मानांकन यादीत दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची साथीदार मार्टिना हिंगीस यानी आपले अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र, पुरुष दुहेरीच्या मानांकन यादीत भारताचा रोहन बोपण्णा नवव्या स्थानावर आहे.

महिला दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत सानिया मिर्झाने 11,395 गुणासह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. हिंगीसने 11,355 गुण नोंदवले आहेत. या टॉप सीडेड जोडीने अलीकडच्या कालावधीत सलग 26 सामने जिंकताना सहा स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. 2012 नंतर विजयी घोडदौड अधिक काळ राखण्णारी सानिया आणि हिंगीस ही जोडी पहिलीच आहे. पुरुष दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा रोहन बोपण्णा नवव्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत ब्राझिलचा मेलो पहिल्या स्थानावर असून, रूमानियाचा तेकॉ दुस-या आणि हॉलंडचा रॉजेर तिस-या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या मानांकन यादीत भारताचा युकी भांब्री 95 व्या स्थानावर आहे. या यादीत सर्बियाचा जोकोव्हिक पहिल्या स्थानावर असून, ब्रिटनचा ऍन्डी मरे आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याना जोकोव्हिकने मागे टाकले आहे.