Whats new

पुण्यातील मुळा, मुठा शुद्धिकरणासाठी जपानसोबत १००० कोटींचा करार

 MULA-MUTHA

पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धिकरणासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’सोबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने करार केला. या अंतर्गत या दोन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य जपानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्ज स्वरूपात हा निधी भारताला मिळणार असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून सांगितले.

पुणे शहरातून वाहणा-या मुळा, मुठा या भीमेच्या उपनद्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये विविध ठिकाणी सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर कच-यामुळे दोन्ही नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे या नद्यांच्या शुद्धिकरणासाठी जपानसोबत करण्यात आलेला करार महत्त्वाचा ठरणार आहे. २०२२ पर्यंत यासाठी पुण्यामध्ये सहा सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. कर्जाची परतफेड केंद्र सरकारकडूनच करण्यात येणार आहे.