Whats new

जेमिनी अरेबियन्स संघाच्या कर्णधारपदाची माळ सेहवागच्या गळ्यात

 SEHWAG

वीरेंद्र सेहवागकडे २८ जानेवारीपासून सुरू होणा-या मास्टर्स चॅम्पियन्स लीगमधील जेमिनी अरेबियन्स संघाच्या कर्णधारपद व संघ संचालकपदाची धुरा देण्यात आली आहे. जेमिनी अरेबियन्स संघाचे संघमालक नलिन खेतान यांनी यासंबंधीची घोषणा केली.

सेहवागसहित सकलेन मुश्ताक, रिचर्ड लेवी, पॉल हॅरिस, जॅक रुडाल्फ, साकिब अली व ग्रॅहम ओनियन्स, मुरलीधरन, चंदरपॉल, ब्रॅड हॉज, कुमार संगकारा, राणा नावेद यांचा जेमिनी अरेबियन्स संघात समावेश आहे. सेहवाग अनुभवी खेळाडू असून, त्याच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल, अशी आशा आहे. शिवाय, त्याच्या नेतृत्वाखालील जेमिनी अरेबियन्स संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही खेतान यांनी व्यक्त केला. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले तब्बल 250 खेळाडू मास्टर्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होत आहेत. लीगमध्ये सहा संघांचा सहभाग असून, स्पर्धेला दि. 28 जानेवारीपासून दुबई येथे सुरुवात होणार आहे.