Whats new

सॅफ स्पर्धेत गगन नारंग, अपूर्वी चंदेला, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा, चेन सिंग होणार सहभागी

 NARANG

पुढील महिन्यात आसाम येथे होणा-या सॅफ स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघाची घोषणा करण्यात आली. या संघात रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाच नेमबाजांचा समावेश आहे. दि. 10 ते 15 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा गुवाहटी येथे होणार आहे. माजी वर्ल्ड चॅम्पियन अभिनव बिंद्राने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच जितू रायही या स्पर्धेत सहभागी होणार नाही.

गगन नारंग, अपूर्वी चंदेला, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा व चेन सिंग हे अव्वल नेमबाज या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेआधी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी दि. 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी होणार असून, ही संधी नेमबाजांसाठी अखेरची असणार आहे.

पुरुष संघ - 50 मी थ्री पी व प्रोन रायफल – चेन सिंग, गगन नारंग, सुरेंद्रसिंग राठोड, 10 मी एअर रायफल- इम्रान हसन खान, गगन नारंग, चेन सिंग, 25 मी फायर पिस्तूल – विजयकुमार, पेंबा तमंग, समरेश जंग, 25 मी रॅपिड फायर पिस्तूल – गुरप्रीत सिंग, विजयकुमार, अक्षय सुहा अष्टपुत्रे, 25 मी पिस्तूल- गुरप्रीत सिंग, नीरजकुमार, महेंद्र सिंग, 50 मी फ्री पिस्तूल- ओम प्रकाश, प्रकाश नजप्पा, ओमकार सिंग, 10 मी एअर पिस्तूल- जितेंद्र विभुते, ओमकार सिंग, गुरप्रीत सिंग.

महिला संघ -50 मी रायफल थ्री पोझिशन- लज्जा गोस्वामी, एलिझाबेथ सुसान कोशी, अंजुम मोदगिल, 50 मी प्रोन रायफल- कुहेली गांगुली, तेजस्विनी सावंत, अनुजा जंग, 10 मी एअर रायफल- अपूर्वी चंदेला, पूजा घाटकर, एलिझाबेथ सुसान कोशी, 25 मी पिस्तूल- अनिसा सय्यद, राही सरनोबत, अन्नुराज सिंग, 10 मी एअर पिस्तूल-हीना सिद्धू, यशस्विनी सिंग देसवाल, श्वेता सिंग.