Whats new

सिक्कीम देशातील पहिले 'संपूर्ण सेंद्रीय' राज्य

 Organic

सिक्कीम हे संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. येथे सुमारे 75 हजार हेक्टर शेतजमिनीत शाश्वत शेती सुरू करण्यात आली आहे. आम्ही संपूर्ण सेंद्रीय हा दर्जा मिळवला आहे. गंगटोक येथे 18 जानेवारी रोजी शाश्वत शेतीविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या या दर्जाची औपचारिक घोषणा करतील, असे सांगण्यात आले.

‘राष्ट्रीय सेंद्रीय उत्पादन कार्यक्रमातील मार्गदर्शक नियमांनुसार सेंद्रीय पद्धती आणि तत्त्वांचा वापर करून जवळपास 75 हजार हेक्टर शेतजमीन हळूहळू प्रमाणित सेंद्रीय जमिनीत रुपांतरित करण्यात करण्यात आली आहे.