Whats new

सचिनच्या आयुष्यावर चित्रपट, तेंडुलकर स्वतःच्याच भूमिकेत

 SACHIN

अवघ्या जगभरातील क्रिकेट रसिकांचं दैवत असलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सचिनच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येणार असून, विशेष म्हणजे खुद्द मास्टर ब्लास्टर तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. मुंबईतील 200 नॉट आऊट या प्रॉडक्शन कंपनीने सचिनचा चरित्रपट आणण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त आहे. जेम्स अर्सकिन यांच्या खांद्यावर दिग्दर्शनाची धुरा देण्यात येणार आहे. चित्रपटाचं नाव मात्र अद्याप ठरलेलं नाही. वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपकडून प्रॉडक्शन कंपनीने हक्क विकत घेतले आहेत. निवृत्तीनंतर सचिनने ‘प्लेयिंग इट माय वे’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. यात त्याने आपल्या ऑन फील्ड आणि ऑफ फील्ड आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यापाठोपाठ खुद्द सचिनवरील चरित्रपटामुळे नवा ट्रेण्ड येण्याची शक्यता आहे.