Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आरती सिंह सीआयडीच्या अधीक्षकपदी

 aarti singh

नागपूर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. डॉ. आरती सिंह या २००६ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे पोलीस उपविभागीय अधिकारी (परिविक्षाधीन) म्हणून त्यांनी सुरुवात केली. ६ जून २०११ पासून भंडा-याच्या पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. १७ जानेवारी २०१४ रोजी नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार त्यांनी स्वीकारला. रुजू होताच त्यांनी नागपूर जिल्हा ग्रामीणची अनेक वर्षे बंद असलेली वेबसाइट सुरू केली.

ग्रामीण पोलिसांचे पगारपत्रक ऑनलाइन केले. ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि रेती माफियांवर नियंत्रण मिळवण्यासही त्यांना ब-यापैकी यश आले. सिंह यांचा पोलिसांवर चांगलाच वचक आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास त्याची तातडीने दखल घेणा-या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. देशभरात गाजलेल्या निर्भया हत्याकांडानंतर नागपूर ग्रामीण भागातील शाळांमध्ये खास विद्यार्थिनींसाठी त्यांच्यामुळेच तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे.