Whats new

ऑस्करच्या शर्यतीत मूळ भारतीयांचे कर्तृत्व झळाळले

 OSCAR

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सनंतर आता सगळ्यांना वेध लागलेत ते ऑस्कर्सचे. 28 फेब्रुवारीला ऑस्कर अवॉर्ड सोहळा पार पडणार आहे. अमेरिकेच्या बेव्हर्ली हिल्समध्ये ऑस्कर नामांकनं म्हणजेच नॉमिनेशन्स जाहीर करण्यात आली. भारतातील क्षेत्रीय सिनेमा कोर्ट, जलम, रंगीतरंगा आणि नाचोम-इया कुंपसार या चित्रपटांना ऑस्करातील नामांकनात बेदखल करण्यात आले आहे. निर्माता चैतन्य तम्हाणे यांची कोर्ट गाला अवार्डकरिता विदेशा भाषेसाठी उत्कृष्ट मानली जात होती. पण, अखेरच्या टप्प्यात ती ‘इम्ब्रैस ऑफ दी सर्पेंट (कोलंबिया), ए वार (डेनमार्क), मस्टंग (फ्रांस), सन ऑफ सोल (हंगरी) और तहीब (जॉर्डन) च्या शर्यतीत मागे पडली. भारतीय चित्रपटांना स्थान मिळाले नसले, तरी मूळ भारतीय असलेल्या दोन दिग्दर्शकांच्या कलाकृतींना ऑस्कर अवार्डच्या नामिनेशनकरिता दाखल करण्यात आले आहे. आसिफ कपाडिया, संजय पटेल अशी या दिग्दर्शकांची नावे आहेत.

‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ला सर्वाधिक 10 विभागात नामांकनं मिळाली आहेत, तर बेस्ट ऍक्टर्सच्या स्पर्धेत तगडा मुकाबला असून मॅट डेमन, मायकल फॅसबेंडरसारख्या ऍक्टर्सचं आव्हान परतवत लिओनार्डो डिकॅप्रिओ आपलं पहिलं ऑस्कर पटकावणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

मॅड मॅक्स, द मार्शन आणि द रेव्हेनंट सारख्या बड्या फिल्मसच्या जोडीला द डॅनिश गर्ल, स्टीव्ह जॉब्स, रूम सारख्या सिनेमांनाही नामांकनं मिळालं आहे. यंदा ऑस्कर्सचं 88 वं वर्ष आहे.
बेस्ट ऍक्टर (नामांकन) लिओनार्डो डिकॅप्रिओ (द रेव्हनंट), मॅट डेमन (द मार्शन), मायकल फॅसबेंडर (स्टीव्ह जॉब्स), ब्रायन क्रॅनस्टन (ट्रंबो), एडी रेडमेन (द डॅनिश गर्ल)
बेस्ट ऍक्ट्रेस (नामांकन), केट ब्लँचेट (कॅरल), ब्री लार्सन (रूम), जेनिफर लॉरेन्स (जॉय), शार्लट रँपलिंग (45 इयर्स), सिओशा रॉनन (ब्रुकलिन)
बेस्ट सिनेमा (नामांकन) : द रेव्हनंट, द मार्शन, ब्रिज ऑफ स्पाईज्, मॅड मॅक्स : फ्युरी रोड, रूम, स्पॉटलाईट, द बिग शॉर्ट