Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सानिया- मार्टिनाने पटकावले सिडनी इंटरनॅशनल टूर्नामेंटचे जेतेपद

 saniya-martin

भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवत चषकावर नाव कोरले. सानिया- मार्टिनाचा हा सलग ३० वा विजय असून त्यांच्या जोडीचा हा ११ वा किताब आहे. अंतिम फेरीत त्यांनी कॅरोलिन ग्रेसिया आणि क्रिस्टिना म्लॅडेनॉव्हिक यांच्या जोडीचा १-६, ७-५, १०-५ असा पराभव केला.

काल झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी रुमानियाची रालुका ओलारू आणि कजाकिस्तानची यारोस्लावा श्वेडोव्हा या जोडीवर विजय मिळवत सलग विजय मिळविण्याचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला होता. जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली सानिया आणि दुस-या क्रमांकावर विराजमान असलेली हिंगीस यांनी २०१६ या नववर्षात दुस-या किताबा नावावर केला. त्या दोघांनी गेल्या आठवड्यात ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना विजेतेपदाला गवसणी घातली होती. २०१५ साली एकत्र आलेल्या सानिया-मार्टिनाने विम्बल्डन आणि यूएस ओपन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांसह अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. सानिया-हिंगीस यांनी एकत्र मिळविलेले हे 11 वे जेतेपद असून या वर्षातील दुसरे अजिंक्यपद आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून त्या अपराजित राहिल्या आहेत. मागील वर्षी शानदार प्रदर्शन करीत त्यांनी 9 अजिंक्यपदे पटकावली, त्यात दोन ग्रँडस्लॅमसह डब्लूटीए फायनलचाही समावेश आहे. या वर्षाचीही त्यांनी दमदार सुरुवात करताना गेल्या आठवडय़ात ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे.