Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अर्थसंकल्पात स्टार्टअप अनुकूल करप्रणाली: जेटली

 start -up

देशातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता आगामी अर्थसंकल्पात स्टार्टअप कंपन्यांना अनुकूल करप्रणाली राबवली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. स्टार्टअपसाठी परवानगी देताना ‘लायसन्स-राज‘ होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

रिझर्व्ह बँकेच्या मदतीने मिळुन सरकार देशातील बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढवणार आहे. भारताच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी क्रेडिटमध्ये वाढ आवश्यक आहे. सरकारकडून उद्योजकांना पुर्णपणे मदत केली जाईल.

यात कंपनी सुरू झाल्यानंतर ती बंद करण्याचे नियम सुलभ बनवणे आणि गुंतवणुकीवर करात सूट मिळावी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्टार्टअप इंडियाच्या या कार्यक्रमातच यासंबंधी काही घोषणा होण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. स्टार्टअपसाठी पैसे जमा करण्याचे नियम सुलभ असायला हवेत, असे मत गुंतवणूकदारांची संघटना ‘टाई सिलिकॉन व्हॅली’ चे अध्यक्षानी व्यक्त केले. अनेक स्टार्टअप कंपन्या बंद होत असल्यामुळे त्यांच्यासाठी बंद करण्याचे नियम अधिक सोपे असायला हवेत.