Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

तेल व वायू संवर्धनात महाराष्ट्र सर्वोत्तम-केंद्र

 oil and gas

तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्रालयांतर्गत कार्य करणा-या पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्या वतीने येथील डीआरडीओ भवनात आयोजित समारंभात केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला.

गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे कार्य करणा-या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. केंद्र सरकराच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी 2015मध्ये तेल व वायू संवर्धन पंधरवाड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तेल व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरवात झाली. वर्षभरात मंत्रालय आणि जिल्हा स्तरावरील कार्यालयांनी राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन, घरगुती वापर आदी क्षेत्रांत जनजागृतीसाठी विविध शिबिरांचे आयोजन केले. या कार्यक्रमात राज्यातील उरण येथील तेल व वायू महामंडळाच्या प्रकल्पाला तेल व वायू संवर्धनासाठी देशातील सर्वोत्तम आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या वर्षी तेल व वायू संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी देशभर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या इयत्ता नववीत शिकणा-या प्रार्थना रानडेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रार्थनाला 30 हजार रुपये रोख, एक लॅपटॉप प्रदान करण्यात आला, तसेच तिला केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्या वतीने जपानमध्ये अभ्यास सहलीसाठी पाठविण्यात येणार आहे.