Whats new

तैसई लँग वेन तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष

 Taiwan

तैवानच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या तैसई लँग वेन यांनी सत्ताधारी कोमिटांग पक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. कोमिटांग पक्षाच्या येथील मुख्यालयासमोर जमलेल्या भावनाप्रधान समर्थकांना संबोधित करताना पक्षाचे उमेदवार इरिक चू यांनी पराभव मान्य केला. मतमोजणी अद्याप पूर्ण झाली नसली तरी दूरचित्रवाणीवरील ताज्या आकडेवारीनुसार तैसई यांच्या डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला ६० टक्के मते पडली आहेत.