Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

कोहलीने मोडला डिव्हिलर्सचा विक्रम; 7000 धावा

 Virat Khohli

भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 7000 धावांचा टप्पा पार करत दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्सच्या नावावर असलेला विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. कोहलीला सात हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 18 धावांची आवश्यकता होता. तर, डिव्हिलर्सचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 19 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज (रविवार) होत असलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ही कामगिरी केली. कोहलीने 161 डावांमध्ये 7000 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तर, डिव्हिलर्सला 7000 धावा पूर्ण करण्यासाठी 166 डावांत फलंदाजी करावी लागली होती. या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली तिस-या स्थानावर आहे. कोहलीने या मालिकेत सलग दोन अर्धशतके झळकाविलेली आहेत.